Milk Price Hike: मुंबईमध्ये म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 5 रुपये दरवाढ; 1 मार्चपासून नवे दर लागू

शहरातील 3,000 हून अधिक किरकोळ विक्रेत्यांकडून विकल्या जाणार्‍या म्हशीच्या दुधाची किंमत 80 रुपये प्रति लिटरवरून 85 रुपये प्रतिलिटर केली जाईल

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्विटर)

महागाईचा सामना करत असलेल्या जनतेला मोठा झटका बसला आहे. मुंबई दूध उत्पादक संघाने (MMPA)) 1 मार्चपासून मुंबई शहरात म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 5 रुपये दरवाढ जाहीर केली आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. एमएमपीएचे अध्यक्ष सी.के. सिंग म्हणाले की, शहरातील 3,000 हून अधिक किरकोळ विक्रेत्यांकडून विकल्या जाणार्‍या म्हशीच्या दुधाची किंमत 80 रुपये प्रति लिटरवरून 85 रुपये प्रतिलिटर केली जाईल आणि ती 31 ऑगस्टपर्यंत लागू राहील. सप्टेंबर 2022 नंतर होणारी ही दुसरी मोठी वाढ आहे. सिंह म्हणाले की, गुरुवारी उशिरा एमएमपीएच्या सर्वसाधारण सभेत एकमताने निर्णय घेण्यात आला. मुंबईमध्ये दररोज 50 लाख लिटरहून अधिक म्हशीच्या दुधाचा वापर होतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement