MHADA: लवकरच सुरु होणार पुणे म्हाडासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया; लॉटरीमध्ये असणार नाही वेटिंग लिस्ट- Jitendra Awhad

यापुढे लॉटरीमध्ये वेटिंग लिस्ट असणार नाही. वेटिंग लिस्ट हे लॉटरी मागील भ्रष्टाचाराचे कारण होते

म्हाडा (Photo Credits-Facebook)

लवकरच पुणे म्हाडातर्फे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रिया सुरु होणार आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘म्हाडाची आज पुणे येथिल लॉटरी बाबत अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे. मागच्या दोन ते अडीच वर्षांमध्ये कोरोनाची परिस्थिती असताना देखिल अनेक ठिकाणी पुणे, औरंगाबाद, नाशिक, मुंबई या ठिकाणी मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे लॉटरीच्या माध्यमातून  उपलब्ध करून देण्याच काम म्हाडामार्फत झाले आहे. पण यापुढे लॉटरीमध्ये वेटिंग लिस्ट असणार नाही. वेटिंग लिस्ट हे लॉटरी मागील भ्रष्टाचाराचे कारण होते. ते आता बंद!’

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement