मुंबईतील जिम ट्रेनर शुभम भगतच्या घरी एनसीबीचा छापा; गांजा-चरस आणि LSGसह अनेक ड्रग्ज जप्त

याप्रकरणी एनसीबीच्या पथकाने शुभम भगतची चौकशी सुरू केली आहे. त्यानंतर जी माहिती समोर येईल त्याआधारे कारवाई केली जाईल. या ड्रग्ज रॅकेटमागे आणखी लोकांचा हात असल्याचा संशय आहे.

एनसीबी (Photo Credits: Twitter)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) पथकाने शनिवारी मुंबई घाटकोपर भागातील पॉवरलिफ्टर आणि जिम ट्रेनर शुभम भगत यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी गांजा, चरस आणि एलएसजीसह इतर अमली पदार्थ जप्त करण्यात आले. एनसीबीने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने शुभमला दोन दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली.

याप्रकरणी एनसीबीच्या पथकाने शुभम भगतची चौकशी सुरू केली आहे. त्यानंतर जी माहिती समोर येईल त्याआधारे कारवाई केली जाईल. या ड्रग्ज रॅकेटमागे आणखी लोकांचा हात असल्याचा संशय आहे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now