Majiwada Flyover Night Closure: ठाणेकरांनो लक्ष द्या! मेट्रोच्या कामासाठी 28 ते 31 मे दरम्यान रात्रीच्या वेळी माजिवडा उड्डाणपूल बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग
मेट्रो बांधकामाच्या कामामुळे माजिवडा उड्डाणपुलावरील रात्रीची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईहून नाशिक, घोडबंदर आणि भिवंडीकडे माजिवडा पुलावरून जाणाऱ्या सर्व वाहनांवर परिणाम होईल.
ठाणे महानगरपालिकेने (TMC) 28 मे ते 31 मे दरम्यान मेट्रो बांधकामाच्या कामामुळे माजिवडा उड्डाणपुलावरील रात्रीची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईहून नाशिक, घोडबंदर आणि भिवंडीकडे माजिवडा पुलावरून जाणाऱ्या सर्व वाहनांवर परिणाम होईल. कापूरबावडी वाहतुक उपविभागाचे हद्दीत माजिवडा मेट्रो स्टेशनवर, 28 ते 31 मे पर्यंत रूफ (मेट्रो स्टेशनचे छत) उभारण्यासाठी कॉलम उभे करून, त्यावर जॅक बिम टाकण्यात येणार असून, जॅक बिम उभारल्यानंतर त्यावर राफ्टर उभारण्यात येणार आहे. सदरचे काम हे 60 टनी मोबाईल क्रेनच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. यामुळे माजिवडा ब्रिजवरून मुंबईकडून नाशिक अथवा घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक चार दिवस रात्री पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
प्रवेश बंद (1)- मुंबईकडून माजिवडा उडाण पुलावरून ज्युपीटर बाय जंक्शन मार्गे घोडबंदरकडे अथवा भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना व्हिव्हियाना मॉलसमोरील ब्रिज चढणीचे सुरुवातीला दुभाजकाजवळ 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- सदरचे मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहने ही ज्युपीटर हॉस्पीटलसमोरील स्लीप रोडने पुढे सरळ जाऊन कापूरबावडी सर्कलमार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद (2)- मुंबईकडून माजिवडा उड्डाणपुलावरून ज्युपीटर वाय जंक्शन मार्गे नाशिककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना व्हिव्हियाना मॉलसमोरील ब्रिज चढणीचे
पर्यायी मार्ग- सदरचे मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहने ही ज्युपीटर हॉस्पीटल समोरील स्लीप रोडने पुढे सरळ जावून गोल्डन कॉस मार्गे इच्छित स्थळी जातील. (हेही वाचा: Mumbai Rash Driving Cases: मुंबईत 2024 मध्ये बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल 10,000 हून अधिक गुन्हे दाखल; वाहनचालकांना 526 कोटी रुपयांचा दंड)
Majiwada Flyover Night Closure:
कापूरबावडी वाहतूक उपविभागाचे हद्दीत दि. २८/०५/२०२५ ते दि. ३१/०५/२०२५ रोजी पर्यंत मुंबई -नाशिक -घोडबंदर माजीवाडा उड्डाणपुलावरील मुख्य वाहिनीवर ज्युपिटर या ठिकाणी मेट्रोचे काम करण्यात येणार असून वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पर्यायी मार्ग. pic.twitter.com/7Xl6uln4ji
— Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@ThaneCityPolice) May 27, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

