Maharashtra Rains: रायगड जिल्ह्यातील तहसिल कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन; जाणून घ्या मदत क्रमांक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सध्या पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः कोकणात पावसाचा चांगलाच जोर पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. आता रायगड जिल्ह्यातील तहसिल कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या दूर्घटना तसेच अनुषंगिक माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची संपर्क यंत्रणा सज्ज आहे. कार्यालयाकडून याबाबतचे मदत क्रमांक जाहीर केले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)