Maharashtra to Reopen Colleges: राज्यात दिवाळी नंतर कॉलेज पुन्हा खुली करण्याबाबत येत्या 2-4 दिवसात निर्णय होणार; उदय सामंत यांचे संकेत
महाराष्ट्रात पुन्हा कॉलेजेस सुरू करण्याबाबतचा निर्णय येत्या 2-3 दिवसांत होण्याची शक्यता मंत्री उदय सामंत यांनी बोलुन दाखवली आहे.
महाराष्ट्रात पुन्हा कॉलेजेस विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये कशी सुरू करायची याबाबत लवकरच शासन निर्णय होणार आहे. यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी यांनी कोविडची लस घेतलेली असावी असं पाहून महाविद्यालयं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय होणार आहे. दरम्यान काही ठिकाणी पूर्ण क्षमतेने तर काही ठिकाणी 30%, 50% क्षमतेने कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी TV9 शी बोलताना दिली आहे.
उदय सामंत यांची प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)