Maharashtra Assembly Winter Session 2023: महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण आणि कर विधेयक विधिमंडळाच्या पटलावर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) विधेयक विधानसभेत मांडले. तर, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी चिट फंड महाराष्ट्र दुरुस्ती विधेयक सभागृहात मांडले.

Devendra Fadnavis | (Photo Credit - Twitter/ANI)

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशना नागपूर येथे आजपासून सुरु झाले आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे पाहायला मिळते आहे. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुष्काळ, अवकाळी, टोलवसूली, आरोग्य, शिक्षण अशा विविध मुद्दायांवर विरोधक आक्रमकअसल्याचे पाहायला मिळते आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकार आपल्या धोरणाने कामकाज चालवते आहे. पहिल्याच दिवशी राज्य सरकारने वेळोवेळी काढलेले आद्यादेश आणि त्या अनुशंघाने विधेयके सभागृहाच्या पटलावर ठेवली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) विधेयक विधानसभेत मांडले. तर, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी चिट फंड महाराष्ट्र दुरुस्ती विधेयक सभागृहात मांडले. सदर विधेयकांवार चर्चा होऊन ती मंजूर झाल्यानंतर राज्यपालांच्या सहीसाठी पाठविण्यात येतील. त्यावर राज्यपालांची सही झाल्यावर त्याचे रुपांतर कायद्यात होईल. (हेही वाचा, Maharashtra Assembly Winter Session 2023: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात)

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now