Lok Sabha Elections 2024: मुंबईकरांना 20 मे रोजी मेट्रो प्रवासात मिळणार 10 टक्के सवलत; मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी Mumbai Metro चा प्रयत्न
मेट्रोने प्रवास करणाऱ्या लोकांना त्यांचे नागरी कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, महामुंबई मेट्रो पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP) कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होत आहे.
Lok Sabha Elections 2024: येणाऱ्या 20 मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान मतदारांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात, मुंबई मेट्रो लाइन 2A आणि 7 च्या प्रवाशांना मतदानाच्या दिवशी विशेष 10 टक्के सूट मिळणार आहे. मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना, मुंबई 1 कार्ड, पेपर क्यूआर आणि पेपर तिकिटांवर मतदान केंद्रांवर पोहोचण्याच्या आणि परत येण्याच्या प्रवासाठी मूळ भाड्यात 10 टक्के विशेष सवलत दिली जाणार आहे. मुंबई मेट्रोच्या या उपक्रमाद्वारे मतदानामध्ये मुंबईकरांचा सहभाग वाढेल अशी अपेक्षा आहे. अशाप्रकारे मेट्रोने प्रवास करणाऱ्या लोकांना त्यांचे नागरी कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, महामुंबई मेट्रो पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP) कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होत आहे. (हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे गंभीर संकट; 15 दिवसांत एकदा टँकरने पाणीपुरवठा, प्रत्येक थेंबासाठी तळमळत आहेत लोक)
पहा पोस्ट-
Lok Sabha Election 2024: 10% Discount on Fare on Mumbai Metro Lines 2 and 7A on May 20 Polling Day
Read👇https://t.co/peuBGbvJe0#LokSabhaElection2024 #MumbaiMetro #Mumbai #IndiaElections2024 #IndiaGeneralElections2024#IndiaElections@MMMOCL_Official @MumbaiMetro01
— Lokmat Times (@lokmattimeseng) May 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 03, 2024 03:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

