Lok Sabha Election 2024 Results: मुंबई उत्तर-पश्चिम जागेवर एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार Ravindra Waikar अवघ्या 48 मतांनी विजयी; Amol Kirtikar यांचा पराभव
या जागेवर प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यूबीटीने इथून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली होती, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने या जागेवर रवींद्र वायकर यांना उभे केले होते.
Lok Sabha Election 2024 Results: महाराष्ट्रातील मुंबई उत्तर पश्चिम जागा व्हीआयपी जागांमध्ये समाविष्ट आहे. यापूर्वी सुनील दत्त, प्रिया दत्त, राम जेठमलानी यांसारखी मोठी नावे ही जागा जिंकून लोकसभेत पोहोचली आहेत. आता या जागेवर प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यूबीटीने इथून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली होती, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने या जागेवर रवींद्र वायकर यांना उभे केले होते. आता निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार माहिती मिळत आहे की, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहे. ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांचा पराभव झाला आहे. अधिकृतरीत्या हा पराभव समोर येण्याआधी उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, या पराभवाला, या निवडणुकीला आपण आव्हान देणार आहे. (हेही वाचा: Lok Sabha Election Results 2024: शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का! श्रीकांत शिंदेंसह केवळ चौघांना खासदारकी टिकवण्यात यश)
पहा पोस्ट-
#RavindraWaikar #Shivsena #loksabhaelctionsResults2024 #MaxMaharashtra@RavindraWaikar pic.twitter.com/7ee2KvqW6D
— Max Maharashtra (@MaxMaharashtra) June 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 09:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

