Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील 8 मतदारसंघात संध्याकाळी 5 पर्यंत 53.51 टक्के मतदान; हिंगोलीमध्ये सर्वात कमी
आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 53.51 टक्के मतदान झाले आहे. आज मतदान झालेल्या सर्व 12 राज्यांमध्ये बिहार, उत्तर प्रदेशनंतर हे सर्वात कमी आहे.
Lok Sabha election 2024: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 वाजलेपासून सुरु झाले आहे. या मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 53.51 टक्के मतदान झाले आहे. आज मतदान झालेल्या सर्व 12 राज्यांमध्ये बिहार, उत्तर प्रदेशनंतर हे सर्वात कमी आहे. आज 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान त्रिपुरा- 77.53%, मणिपूर- 76.06%, पश्चिम बंगाल- 71.84%, आसाम- 70.66%, छत्तीसगड- 72.13% या राज्यांमध्ये झाले.
दुसऱ्या टप्प्यातील एकूण 8 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे-
वर्धा- 56.66 टक्के
अकोला- 52.49 टक्के
अमरावती- 54.50 टक्के
बुलढाणा- 52.24 टक्के
हिंगोली- 52.03 टक्के
नांदेड- 52.47 टक्के
परभणी- 53.79 टक्के
यवतमाळ आणि वाशिम- 54.04 टक्के (हेही वाचा: Lok Sabha Elections 2024: उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांच्या मिरवणुकांवर प्रशासनाची करडी नजर; वाहन, खाद्यपदार्थ, प्रचार साहित्य इ खर्चाची होणार पडताळणी)
राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सायं. ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान
➡️वर्धा- ५६.६६ टक्के
➡️अकोला- ५२.४९ टक्के
➡️अमरावती- ५४.५० टक्के
➡️बुलढाणा- ५२.२४ टक्के
➡️हिंगोली- ५२.०३ टक्के
➡️नांदेड- ५२.४७ टक्के
➡️परभणी- ५३.७९ टक्के
➡️यवतमाळ-वाशिम- ५४.०४ टक्के pic.twitter.com/z6IKFtOFoN
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 26, 2024 07:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

