Jalna-CSMT Vande Bharat Train च्या ब्रेक मध्ये बिघाड; 25 मिनिटं रखडल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 डिसेंबर रोजी अयोध्येहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस या महाराष्ट्रातील सहाव्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.

Vande Bharat | Twitter

जालना-सीएसएमटी वंदे भारत ट्रेन आज पुन्हा रखडली होती. जालना कडून मुंबई कडे येणार्‍या ट्रेनमध्ये आज (16 जानेवारी) सकाळी ब्रेक बिघडले होते. आसनगाव स्थानकामध्ये ही ट्रेन सुमारे 30 मिनिटं थांबवण्यात आली होती त्यानंतर ती सीएसएमटी कडे रवाना झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. सकाळी 5.5 ला निघालेली ट्रेन दुपारी 11.55 ला पोहचते मात्र आज तिला उशिर झाला आहे. काही दिवसांपूर्वी याच ट्रेनने बैलाला धडक मारल्याचेही वृत्त समोर आले होते. नक्की वाचा: Mumbai Metro Service Disrupted: दहिसर कांदिवली दरम्यान मुंबई मेट्रो सेवा ठप्प, प्रवसी ट्रॅकवर उतरले (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)