HC on Loudspeaker Use: 'गणेशोत्सवात लाऊडस्पीकर हानिकारक असेल, तर ते ईदच्या काळातही धोकादायक आहे'- Bombay High Court

न्यायालयाने सांगितले की, ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, 2000 अंतर्गत निर्दिष्ट मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या ध्वनी यंत्रणा या गणेशोत्सवामध्ये हानिकारक असतील, तर त्या ईदसाठीही हानिकारक आहेत.

Bombay High Court (Photo Credit: PTI)

HC on Loudspeaker Use: सणासुदीच्या काळात मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकरच्या वापराबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. गणेशोत्सवादरम्यान एका पातळीपेक्षा मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवणे हानिकारक असेल, तर ईदच्या मिरवणुकांमध्येही त्याच्या वापराचे परिणाम होतील, असे उच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले. मुख्य न्यायमूर्ती डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीत डीजे, डान्स आणि लेझर लाइटच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या अनेक जनहित याचिकांवर (पीआयएल) सुनावणी करताना हे सांगितले. हायकोर्टाने महापालिका आणि पोलिसांना अशा हाय डेसिबल साउंड सिस्टिमच्या वापरास परवानगी देण्यापासून परावृत्त करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकांमध्ये करण्यात आली आहे. यावेळी

यासह लेझर लाइटच्या वापरावर खंडपीठाने याचिकाकर्त्यांना अशा प्रकाशाच्या मानवांवर होणाऱ्या हानिकारक परिणामांबाबत वैज्ञानिक पुरावे दाखवण्यास सांगितले. अशा याचिका दाखल करण्यापूर्वी योग्य संशोधन केले पाहिजे, असे खंडपीठाने म्हटले आहे. (हेही वाचा: Ganesh Visarjan: गणपती विसर्जन सोहळ्यादरम्यान वडिलांसह 2 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; कर्नाटक मधील घटना)

लाऊडस्पीकर वापरावर मुंबई उच्च न्यायालयाची टिपण्णी-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now