Ganeshotsav 2022: मुंबईमध्ये गणेशोत्सव मंडळांकडून प्राप्त झालेल्या 1,249 अर्जांपैकी 503 जणांना परवानगी; 506 अद्याप प्रक्रियेत
सरकारने धार्मिक महत्त्व असलेल्या या उत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोविड निर्बंध उठवले असल्याने मंडळे बाप्पाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.
31 ऑगस्ट रोजी सुरु होणाऱ्या गणपती उत्सवापूर्वी, बीएमसीने गेल्या एका महिन्यात विविध गणेशोत्सव मंडळांकडून प्राप्त झालेल्या 1,249 अर्जांपैकी 503 अर्जांना परवानगी दिली आहे. 102 मंडळांना परवानग्या नाकारण्यात आल्या असून उर्वरित 506 अर्ज अद्याप प्रक्रियेत आहेत. साथीच्या आजारापूर्वी, सुमारे 3,000 मंडळे परवानगीसाठी अर्ज करत असत. सरकारने धार्मिक महत्त्व असलेल्या या उत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोविड निर्बंध उठवले असल्याने मंडळे बाप्पाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. बीएमसीच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये सुमारे 2,520 मंडळांनी परवानग्या मागितल्या होत्या; त्यापैकी 1,996 मंजूर करण्यात आले. 2020 मध्ये, केवळ 1,700 मंडळांना नागरी संस्थेची मंजुरी मिळाली.
Advertisement
संबंधित बातम्या
BMC Eco-friendly Ganeshotsav 2025: पर्यावरणपूरक मूर्तीसाठी मुंबई महापालिका फुकट पुरवणार शाडूची माती
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
MAH CET 2025 Schedule Released: एमएएच सीईटी पीसीएम, पीसीबी ग्रुप ची परीक्षा कधी? cetcell.mahacet.org वर पहा अंतिम वेळापत्रक
Novak Djokovic: टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचच्या हत्येचा झाला होता? जेवणातून दिले होते विष, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement