Novak Djokovic: टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचच्या हत्येचा झाला होता? जेवणातून दिले होते विष, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या नावावर अनेक विक्रम आहेत. जोकोविचने अलीकडेच एक खळबळजनक दावा केला आहे.

Novak Djokovic: टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचच्या हत्येचा झाला होता? जेवणातून दिले होते विष, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
Novak Djokovic (Photo Credits Facebook)

Novak Djokovic: सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या नावावर अनेक विक्रम आहेत. जोकोविचने अलीकडेच एक खळबळजनक दावा केला आहे. जोकोविचने म्हटले आहे की ऑस्ट्रेलियन ओपन 2022 पूर्वी त्याच्या जेवणात विष मिसळण्यात आले होते. कोरोना विषाणूमुळे जोकोविचला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्याने लस घेतली नसल्याने त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्या जेवणात विष मिसळल्याचा दावा जोकोविचने केला.  (हेही वाचा  -  Novak Djokovic: मियामी ओपन स्पर्धेतून नोवाक जोकोविचची माघार, कोरोना लस न घेतल्यामुळे अमेरिकेत प्रवेशबंदी )

खरंतर जोकोविच या वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम, ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी गेला आहे. यादरम्यान त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. जोकोविचने एका मुलाखतीत सांगितले की, त्याच्या जेवणात विष मिसळले होते. जोकोविचने GQ या मासिकाला मुलाखत दिली. तो म्हणाला, "मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये मला विषारी अन्न देण्यात आले. यामुळे मी आजारी पडलो. जेव्हा मी सर्बियाला परतलो तेव्हा मला कळले की माझ्या शरीरात जड धातूंचे प्रमाण जास्त आहे. माझ्या शरीरात शिसे आणि पाराचे प्रमाण जास्त आढळले.

2022 मध्ये जोकोविचसोबत काय घडले -

कोविड-19 च्या नियमांमुळे जोकोविच 2022 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होऊ शकला नाही. कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती दिल्याबद्दल त्याला ताब्यात घेण्यात आले. यासोबतच त्याला चार दिवस एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. हे एक अटक केंद्र होते. यानंतर जोकोविचला परत पाठवण्यात आले. जोकोविचने कोरोनाची लागण झाल्याची माहितीही लपवली होती, असा दावा करण्यात आला होता.

जोकोविचच्या नावावर अनेक विक्रम आहेत -

जोकोविचच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. त्याने 24 पुरुष एकेरी ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. जोकोविच बऱ्याच काळापासून जगातील नंबर 1 खेळाडू आहे. तो सध्या एटीपी क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी पॅरिस ऑलिंपिकमध्येही जोकोविचने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले होते.

(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2025 03:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).