Gadchiroli Lok Sabha Election 2024: गेल्या 6 महिन्यांपासून तयारी, 130 ड्रोनची व्यवस्था, 15,000 पोलीस तैनात; नक्षलग्रस्त गडरिचोली भागात लोकसभा निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त

गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग असल्याने इथे निवडणूक शांततेमध्ये पार पडावी यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली जात आहे. या नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मतदान (File Image)

Gadchiroli Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील गडचिरोली येथे येत्या 19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग असल्याने इथे निवडणूक शांततेमध्ये पार पडावी यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली जात आहे. या नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत गडचिरोलीचे एसपी, नीलोत्पल म्हणतात, 'आम्ही गडचिरोलीत 19 एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची तयारी करत आहोत. गेल्या सहा महिन्यांपासून ही तयारी सुरु आहे. या ठिकाणी एकूण 87 पोलिसांच्या टीम्स तैनात असतील. गडचिरोलीत मतदानाच्या दिवशी 15,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाईल.'

प्रभारी C60 कमांडो, इन्स्पेक्टर कल्पेश खारोडे यांनी सांगितले की, त्यांची जंगलात शोध मोहीम सुरू आहे. C60 कमांडो युनिटही तैनात करण्यात येत आहे. तसेच ड्रोनचाही वापर केला जात आहे. (हेही वाचा: Loksabha Election 2024: 'काँग्रेसची इतकी केविलवाणी स्थिती कधीच झाली नव्हती', सांगली आणि भिवंडीच्या जागेवरुन अशोक चव्हाण यांची टीका)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement