Woloo Women Toilet: महिला प्रवाशांसाठी मुलुंड स्थानकांवर पहिले वुलू टॉयलेट सुरू, सुरक्षेसह मिळणार विविध सुविधा
त्यामुळे बहुतांश महिला प्रवासी स्वच्छतागृहांचा वापर करणे टाळतात किंवा अगदी इमर्जन्सीमध्येच वापर करतात. महिला प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ही सुविधा सुरु केली आहे.
Mumbai: गुरुवारपासून मुलुंड स्थानकावर स्वतंत्र पहिले वुलू टॉयलेट सुरू करण्यात आले आहे. येथे एकाच छताखाली महिलांना सुरक्षेसह विविध सुविधा मिळणार आहेत. महिला प्रवाशांकरिता सहा रेल्वे स्थानकांवर खासगी कंपनीचे हायटेक महिला स्वच्छतागृह सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. दिवसाला 75 लाख लोक उपनगरीय लोकलने प्रवास करतात. यामध्ये साधारण 20 लाखांपेक्षा जास्त महिला प्रवाशांची संख्या आहे. मात्र रेल्वे स्थानकावरील बहुतांश महिला स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे बहुतांश महिला प्रवासी स्वच्छतागृहांचा वापर करणे टाळतात किंवा अगदी इमर्जन्सीमध्येच वापर करतात. महिला प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन मध्य रेल्वेने खासगी कंपनीच्या मदतीने मध्य रेल्वे मार्गावरील एलटीटी, घाटकोपर, कांजूरमार्ग, ठाणे, मानखुर्द आणि चेंबूर या आणखी सहा स्थानकांत वुलू सुरू करण्यात येणार आहेत. (हे देखील वाचा: Children's Rights Organization On RTE Admissions: खाजगी शाळांमधील सामाजिक-आर्थिकदृष्ट्या उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी आरटीई प्रवेशातील विलंबाचे स्पष्टीकरण द्या; बाल हक्क संघटनेची मागणी)