Firing Incident at Badlapur Railway Station: बदलापूर हादरले! रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना, पोलिसांकडून तपास सुरु

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर बदलापूर रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा गोळीबार नेमका का करण्यात आला, याचा तपास सुरु आहे.

Firing | Representational image (Photo Credits: pixabay)

Firing Incident at Badlapur Railway Station: बदलापूर रेल्वे स्थानकावर आज संध्याकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली. बदलापूर स्टेशनवर संध्याकाळी 6च्या सुमारास एका इसमाकडून दोघांवर गोळीबार करण्यात आला. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे स्टेशनवर एकच गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी विकास नाना पगारे या तरुणाला अटक केली आहे. अहवालानुसार त्यानेच हा गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा: Nagpur Accident: नागपूरमध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत 4 ठार, 20 जण जखमी)

बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now