Mumbai Local : आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकलच्या चाकाला लागली आग (Watch Video)

मध्य रेल्वेवरील आसनगाव रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या एका लोकलच्या चाकाला आग लागल्याची घटना घडली आहे.

Mumbai-Local

आज आसनगाव ( Asangaon ) रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून (Mumbai Local) अचानक धूर निघाला आणि त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी मध्येच लोकल थांबवली आणि खाली उतरले. धूराच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अनेक प्रवाशांनी लोकलमधून खाली उड्या टाकल्या. ब्रेकमध्ये घर्षण झाल्याने लोकलच्या चाकाला आग लागल्याची प्राथमिक माहिती  समोर आले. या सर्व प्रकारामुळे मध्य रेल्वेवरील (Central Railway) वाहतुक विलंबाने सुरु आहे.

पहा व्हिडीयो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)