Mumbai: मालाड पश्चिम येथील गिरनार गॅलेक्सी अपार्टमेंटला आग, 8 जण जखमी
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मालाड-पश्चिमेला अंकल किचेन्सजवळील सुंदर लेनमधील गिरनार गॅलेक्सी इमारतीत ही आग लागली होती. मंगळवारी सकाळी 9.48 वाजता ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या अग्निशमन कार्यानंतर आग विझवण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
Mumbai: मालाड-पश्चिम येथे मंगळवारी सकाळी आठ मजली इमारतीला लागलेल्या आगीत (Fire) 8 जण जखमी झाले. जखमी झालेल्या आठ जणांपैकी तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. आग भडकली आणि तळमजल्यावरील मीटरच्या केबिनपर्यंत पोहोचली. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मालाड-पश्चिमेला अंकल किचेन्सजवळील सुंदर लेनमधील गिरनार गॅलेक्सी इमारतीत ही आग लागली होती. मंगळवारी सकाळी 9.48 वाजता ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या अग्निशमन कार्यानंतर आग विझवण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. जखमींना सुरुवातीला थुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना अरोली बर्न रुग्णालयात हलवण्यात आले. गंभीर रुग्णाला शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. आगीच्या घटनेत जखमी झालेल्या आठ जणांपैकी बहुतांश ज्येष्ठ नागरिक आहेत.
पहा व्हिडिओ -