FIR Against Mangesh Satamkar: बलात्कार प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेते मंगेश सातमकर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप फिर्यादीत आहे.

Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर 29 वर्षीय तरुणीने खळबळजनक आरोप केला आहे. मुलीने वडाळा टीटी पोलीस ठाण्यात सातमकर यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची लेखी तक्रार दाखल केली आहे. अशा परिस्थितीत काही फोटो आणि ऑडिओ क्लिप CRIME TAK च्या हाती लागली आहे. पीडित मुलगी ही मंगेश सातमकर यांचे सोशल मीडिया आणि पीआरचे काम पाहत होती. आता महिलेवर बलात्कार प्रकरणी नेते मंगेश सातमकर यांच्याविरुद्ध अँटॉप हिल पीएस येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप फिर्यादीत आहे. एफआयआरमध्ये आयपीसी कलम 376(2)(N), 312, 420, 504, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.