Ex-BrahMos Engineer Gets Life Imprisonment: ब्रह्मोसचा माजी अभियंता Nishant Agarwal ला जन्मठेपेची शिक्षा; पाकिस्तानच्या ISI साठी केली हेरगिरी
ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडचा माजी अभियंता निशांत अग्रवाल याला 2018 मध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.
Ex-BrahMos Engineer Gets Life Imprisonment: पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला ब्रह्मोसचा माजी अभियंता निशांत अग्रवाल याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निशांतला तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडचा माजी अभियंता निशांत अग्रवाल याला 2018 मध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी नागपूर जिल्हा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने त्याला ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टच्या कलम 3 आणि 5 अंतर्गत दोषी ठरवले आहे. अग्रवाल हा नागपूर येथील कंपनीच्या क्षेपणास्त्र केंद्रात तांत्रिक संशोधन विभागात कार्यरत होता. अग्रवालला ऑक्टोबर 2018 मध्ये यूपी आणि महाराष्ट्र एटीएस आणि मिलिटरी इंटेलिजन्सने नागपूरजवळ अटक केली होती. ब्रह्मोसमध्ये चार वर्षे काम करणाऱ्या अभियंता निशांत अग्रवालवर भारतीय दंड संहिता (IPC), आयटी कायदा आणि कडक अधिकृत गुप्तता कायदा (OSA) च्या विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (हेही वाचा: CM Kejriwal Surrendered: तिहार येथे आत्मसमर्पण केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना 5 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)