7th Pay Commission: राज्यातील 1410 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे Devendra Fadnavis यांचे निर्देश; कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप मागे
राज्यातील विविध विद्यापीठे आणि अनेक महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला होता.
सातवा वेतन आयोग लागू करण्याचे राहून गेलेल्या 1410 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठातल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप आज मागे घेतला आहे. राज्यातील विविध विद्यापीठे आणि अनेक महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला होता. या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दोन फेब्रुवारीपासून कामकाजावर बहिष्कार घातला होता. त्यानंतर त्यांनी 16 फेब्रुवारीला लाक्षणिक संप पुकारला होता. आता सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.