Ashadhi Wari 2022: संत गजानन महाराजांच्या पालखीचं आषाढी वारीकरता पंढरपूरकडे प्रस्थान

आज सकाळी 7 वाजता शेगाव येथील श्री संत गजानन महारांजाच्या मंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले.

संत गजानन महाराज पालखी (PC - Twitter)

Ashadhi Wari 2022: बुलडाणा जिल्हयातील शेगाव येथून संत गजानन महाराजांच्या पालखीचं आषाढी वारीकरता पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे. आज सकाळी 7 वाजता शेगाव येथील श्री संत गजानन महारांजाच्या मंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले. त्यानंतर ही पालखी दुपारी 'श्री क्षेत्र नागझरी' येथे आगमन व पारस येथे मुक्काम करणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 7 जून रोजी अकोल्यातील गायगांव येथे आगमन व भौरद येथे मुक्काम करणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)