Deepfakes During Elections: निवडणूक काळात डीपफेक कंटेंटमध्ये वाढ; आता पोलीस करणार कडक कारवाई, राज्य सरकारचे निर्देश

राज्यात या गैरप्रकारांना तोंड देण्यासाठी तसेच त्यांना आळा घालण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने कठोर कारवाईची घोषणा केली आहे.

Deepfakes (संग्रहित संपादित प्रतिमा)

Deepfakes During Elections: देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक नेत्यांचे ‘डीप फेक’ व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. आता राज्यात या गैरप्रकारांना तोंड देण्यासाठी तसेच त्यांना आळा घालण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने कठोर कारवाईची घोषणा केली आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे अशा प्रकारचा मजकूर पसरवण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालकांना निर्देश जारी केले आहेत. फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध तंत्रांचा गैरवापर करून डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करण्यात येतो.

निवडणूक काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असून यावर आळा घालण्यासाठी तसेच स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने ‘डीप फेक’ कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. पोलीस खात्यामार्फत यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे. (हेही वाचा: Shiv Sena (UBT) Campaign Ad: 'माफी मागा अथवा कायदेशीर कारवाईला तयार रहा'; आपला Porn Star असा उल्लेख केल्याबद्दल अभिनेता Raj Nayani यांचा चित्रा वाघ यांना इशारा)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)