'No Cracks on Atal Setu': अटल सेतू पुलाच्या मुख्य भागात कोणताही तडा गेला नाही; कॉंग्रेसच्या आरोपांवर MMRDA चे स्पष्टीकरण
कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. अटल सेतूला जोडणाऱ्या अप्रोच रोडवर किरकोळ भेगा पडल्या आहेत.
'No Cracks on Atal Setu': देशातील सर्वात लांब सागरी पुल 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' म्हणजेच अटल सेतूला अवघ्या 5 महिन्यांत तडे गेल्याची बातमी समोर आली होती. याच वर्षी 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. हा सागरी पूल 17,843 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. मात्र जोरदार पावसाने अटल सेतूवर रस्त्याला भेगा पडल्याचा आरोप महाराष्ट्र कॉंग्रेसने केला होता. आता याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने स्पष्टीकरण जारी केले आहे. अटल सेतू पुलाच्या मुख्य भागात कोणताही तडा गेला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एमएमआरडीएने सांगितले की, अटल सेतूला तडा गेल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. अटल सेतूला जोडणाऱ्या अप्रोच रोडवर किरकोळ भेगा पडल्या आहेत. हा मुख्य पुलाचा भाग नसून पुलाला जोडणारा सर्व्हिस रोड आहे. रस्त्याला गेलेले हे तडे प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नाहीत आणि पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नाही.’ अटल सेतू प्रकल्पाच्या पॅकेज 4 चा कंत्राटदार, मेसर्स स्ट्रॅबॅग या कंपनीने सदर भागातील भेगा दुरुस्तीचे काम सुरू केले असून सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता 24 तासांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचेही ‘एमएमआरडीए’मार्फत कळविण्यात आले आहे. (हेही वाचा: Cracks On Atal Setu Viral Video: अटल सेतूच्या रस्त्याची पहिल्याच जोरदार पावसानंतर दुर्दशा; नाना पटोले यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट करत मोदी सरकार वर टीका)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)