Cow Dung Applied On Car: वाढत्या तापमानात उष्णतेपासून वाचण्यासाठी कारला दिला शेणाचा लेप; Pandharpur येथील व्हिडीओ व्हायरल (Watch)

एका आयुर्वेदिक डॉक्टरने कारला थंड ठेवण्यासाठी चक्क गाडीला शेणाचा लेप दिला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तर पंढरपूर येथून गायीच्या शेणाने लेपित केलेल्या महिंद्रा XUV 300 चा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Cow Dung Applied On Car

उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना फक्त मानवांनाच नाही तर वाहनांनाही करावा लागतो. ऑटोमोबाईलबाबत उत्साही लोक आणि कार मालक नक्कीच याच्याशी सहमत असतील. तर उन्हाळ्यात कार मालकांना नेहमीच हा प्रश्न पडतो की, या उष्णतेत कारला नक्की थंड कसे ठेवायचे? सावलीत किंवा एसी-सक्षम जागांमध्ये पार्किंग प्रभावी असले तरी, अलीकडेच एक पर्यावरणपूरक आणि देशी पद्धत व्हायरल झाली आहे. एका आयुर्वेदिक डॉक्टरने कारला थंड ठेवण्यासाठी चक्क गाडीला शेणाचा लेप दिला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तर पंढरपूर येथून  गायीच्या शेणाने लेपित केलेल्या महिंद्रा XUV 300 चा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आयुर्वेदिक चिकित्सक डॉ. राम हरी कदम यांनी त्यांच्या MH 13 DT 7778 या नोंदणी प्लेट असलेल्या कारला, वाढत्या तापमानात थंड ठेवण्यासाठी शेंचा लेप दिला आहे. त्यांनी लोकांना गोमूत्रात शेण मिसळून त्याची पेस्ट तयार करण्यास आणि काळजीपूर्वक त्यांच्या वाहनांच्या बाह्य पृष्ठभागावर पसरवण्यास सांगितले. डॉक्टरांनी प्रादेशिक वृत्त माध्यमांना सांगितले की, मुसळधार पाऊस पडला नाही तर हे आवरण पाच महिन्यांपर्यंत टिकते. लोकसत्तामधील एका वृत्तानुसार, त्यांनी यापूर्वी त्याच्या दुचाकीला आणि घराच्या भिंतींनाही शेणाचा लेप दिला होता. (हेही वाचा: Pune BMW Incident: पुणे येथे बीएमडब्ल्यू कारमधील उच्चभ्रू तरुणाचे शास्त्री चौकात लज्जास्पद वर्तन; व्हिडिओ व्हायरल)

Cow Dung Applied On Car:

 

View this post on Instagram

 

A post shared by AB Marathi News (@abnewsmarathi)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement