Mumbai Local ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा! लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना मिळणार लोकलचे तिकीट

मध्य आणि पश्चिम रेल्वेने आजपासून प्रवाशांना दररोज तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Local Train | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी दिलासादायक बाब आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने आजपासून प्रवाशांना दररोज तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विरोधी लसीचे दोन डोस पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्यासाठी एकदिवसीय तिकीट मिळणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते सुमित ठाकूर यांनी सांगितले की, आजपासून सर्व काउंटरवर तिकिटे दिली जातील. याआधी लसीकरण करुन 14 पूर्ण झाले असेल तर प्रवाशांना मासिक पास किंवा सीझन पास देण्यात येत होता, मात्र आता प्रवाशांना पूर्वी सारखा एकदिवसाचा प्रवास करण्यासाठी तिकीट मिळणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement