Chhagan Bhujbal Admitted To Hospital: छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली; पुण्याहून विशेष विमानाने मुंबईतील रुग्णालयात दाखल

भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना विशेष विमानाने पुण्याहून मुंबईत आणण्यात आले. भुजबळ यांना मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

छगन भुजबळ (Photo Credits-Twitter)

Chhagan Bhujbal Admitted To Hospital: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना गुरुवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना विशेष विमानाने पुण्याहून मुंबईत आणण्यात आले. भुजबळ यांना मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

छगन भुजबळ रुग्णालयात दाखल - 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement