Car Drowned in Nira Devghar Dam: पुण्यात कार सह 3 प्रवासी धरणात बुडल्याची भीती; शोधकार्य सुरू

पुणे-रायगड जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र तरीही काही नागरिक जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून प्रवास करत आहेत.

Drowning प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रातील अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. पुण्यात नीरा देवघर धरणामद्ये एक कार तीन प्रवाशांसह बुडल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. हा अपघात आज सकाळी वरंध घाट परिसरात झाला आहे. 3 पुरूष आणि एक महिला गाडीतून प्रवास करत होते. एकाची सुखरूप सुटका झाली आहे अन्य 3 बुडाल्याची भीती वर्तवली जात आहे. सध्या या तिघांचा शोध सुरू आहे. पुण्यात सध्या दरडी कोसळण्याच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूकीत अडथळा येत आहे. Nashik Gangapur Dam: नाशिकच्या गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement