Bus Catches Fire on Pune-Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर व्होल्वो बसला आग; स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी गाडीतून मारल्या उड्या (Video)

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बसमधून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली.

Bus Catches Fire on Pune-Satara Highway

उन्हाळा वाढत असताना, वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. नुकतीच अशी एक दुर्घटना पुणे-सातारा मार्गावर घडली. गुरुवारी सकाळी पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूरजवळ एका एसी व्हॉल्वो बसला आग लागली. बसला आग लागल्याचे समजताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी गाडीतून उड्या मारल्या. चालकाच्या जलद कारवाईमुळे बसमधील सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आले. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना दुपारी 12 वाजता घडली. बस वेगाने जात असताना खेड शिवापूरजवळ येताच इंजिन क्षेत्रातून धूर निघू लागला. काही क्षणातच गाडीला आग लागली. प्रवाशांना वेळेत बसमधून बाहेर पडण्यात यश आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बसमधून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. स्थानिक पोलीस आणि बस कंपनीने चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा खाजगी बस ऑपरेटर्सनी पाळलेल्या सुरक्षा मानकांवर चिंता व्यक्त झाली आहे. (हेही वाचा: Koyta Gang In Pune: पुण्यात कोयता गँगची दहशत! कोंढव्यात डझनहून अधिक वाहनांची केली तोडफोड)

Bus Catches Fire on Pune-Satara Highway:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement