BJP Maharashtra Candidates List: भाजपकडून लोकसभेसाठी महाराष्ट्रातील 20 नावांची घोषणा; नितीन गडकरी, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी
भाजपच्या दुसऱ्या यादीत 72 नावे जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रामाधून एकूण 20 जागांवरील नावांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या नागपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
BJP Maharashtra Candidates List: भारतीय जनता पक्षाने बुधवारी (13 मार्च) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. भाजपच्या दुसऱ्या यादीत 72 नावे जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रामाधून एकूण 20 जागांवरील नावांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या नागपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. गडकरी या जागेवरून विद्यमान खासदार आहेत. याशिवाय उत्तर मुंबईमधून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी मिळाली आहे. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, जालना येथून रावसाहेब दानवे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अहमदनगर येथून सुजय विखे-पाटील, बीडमधून पंकजा मुंडे तर सांगली येथून संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (हेही वाचा: Lok Sabha Elections 2024: नितीन गडकरी यांची लोकसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या मागणीसाठी सरसावले नागपूरकर)
पहा संपूर्ण यादी-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)