रोहित पवारांना मोठा झटका; ED ने जप्त केली बारामती ऍग्रोच्या साखर कारखान्यासह 50 कोटी रुपयांची मालमत्ता

कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेड (कन्नड एसएसके) ची एकूण 161.30 एकर जमीन, प्लांट, यंत्रसामग्री आणि इमारत मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आली आहे.

Enforcement Directorate | (File Image)

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी सांगितले की, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) सुप्रिमो शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या कंपनीच्या मालकीच्या साखर कारखान्याची 50 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ही कारवाई महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड गावात असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेड (कन्नड एसएसके) ची एकूण 161.30 एकर जमीन, प्लांट, यंत्रसामग्री आणि इमारत मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आली आहे. कन्नड एसएसकेची मालकी बारामती ऍग्रो लि. या रोहित पवारांच्या कंपनीकडे आहे. याआधीही चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने बारामती ॲग्रो आणि त्याच्याशी संबंधित कंपनीच्या जागेवर छापे टाकले होते. (हेही वाचा: Mumbai: तब्बल 23 हून अधिकांची नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; मध्य रेल्वेच्या तत्कालीन मुख्य डेपो मटेरियल सुपरिटेंडंटला CBI कडून अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)