Bibat Safari: जुन्नर तालुक्यात सुरु होणार ‘बिबट सफारी’; जाणून घ्या काय असणार सुविधा
मौजे आंबेगव्हाण येथे दाट वनक्षेत्र असून ते नागरीकरणापासून दूर असल्याने या ठिकाणी बिबट सफारी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
Bibat Safari: पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी सुरु करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळ निर्णयाने त्यावर शिक्कामोर्तब झाल्याने आता जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर तालुक्यातील वन व निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. बिबट सफारीच्या स्थळ निश्चितीसाठी जुन्नर वन विभागाच्या स्तरावर नेमलेल्या 09 सदस्यीय समितीने सुचविलेल्या स्थळांपैकी आंबेगव्हाण येथे बिबट सफारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मौजे आंबेगव्हाण येथे दाट वनक्षेत्र असून ते नागरीकरणापासून दूर असल्याने या ठिकाणी बिबट सफारी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. बिबट सफारी प्रकल्पासाठी एकूण 54 हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात आली असून केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन या सफारी मध्ये पर्यटक व बिबट वन्यप्राणी यांच्या सुरक्षिततेसाठी विद्युत स्वयंचलित व सेन्सर असलेले दुहेरी प्रवेशद्वार, सफारी रस्ता, रात्रीचे निवारे, संरक्षक भिंत आदी सुविधा असणार आहेत. (हेही वाचा: Health Department Recruitment: आरोग्य विभागात भरली जात आहेत तब्बल 10 हजार 949 पदे; 8 फेब्रुवारीपर्यंत होणार 10 संवर्गातील नियुक्त्या)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)