Baramati Lok Sabha Election 2024: बारामती मध्ये Supriya Sule यांनी पती सदानंद सुळे, आई प्रतिभा पवार यांच्यासोबत बजावला मतदानाचा अधिकार ( Watch Video)
सुप्रिया सुळे यांच्या विरूद्ध निवडणूकीच्या रिंगणामध्ये त्यांच्या भावजय सुनेत्रा पवार यांचं आवाहन आहे. सुप्रिया सुळे बारामतीच्या 3 टर्म खासदार आहेत.
बारामती मध्ये माळेगावात शरद पवारांनी मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी बारामती शहरात आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी त्यांच्यासोबत पती सदानंद सुळे, मुलं रेवती आणि विजय सुळे यांनीही बारामती मध्येच मतदान केले आहे. प्रतिभा पवार आणि अन्य कुटुंबियांनी देखील यावेळी मतदान केले आहे. पवार कुटुंबासाठी यंदाची लोकसभा निवडणूक भावनिक आणि प्रतिष्ठेची आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या भावजय सुनेत्रा पवार यांचं आव्हान आहे. Baramati Lok Sabha Election 2024: बारामती मध्ये बुरूडमाळ गावात अवघ्या 41 मतदारांसाठी उभं राहिलं 77 वर्षांत पहिल्यांदा मतदान केंद्र! (Watch Video) .
सुप्रिया सुळेंचं मतदान
रोहित पवार यांचं सहकुटुंब मतदान
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)