Baba Siddique On meeting With Ajit Pawar: 'अजित पवार आमचे नेते नाहीत हे पाहून आमचं दुर्भाग्य ...' पहा बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या गटात सामील होण्याच्या चर्चांवर काय म्हणाले?

बाबा सिद्दीकी यांनी आपण अजूनतरी कॉंग्रेस मध्ये असल्याचं म्हटलं आहे पण त्यांनी यावेळी अजित पवारांवर स्तुतिसुमनं देखील उधळली आहेत.

Baba Siddique Ajit Pawar | Twitter

मुंबई मध्ये मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ झीशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी कॉंग्रेस सोडणार असल्याची चर्चा रंगत आहे. यावर बाबा सिद्दीकी यांनी ANI शी बोलताना अजित पवारांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. 'अजित पवार 'वर्कोहॉलिक आहेत. त्याचा कामाचा सपाटा पाहून हे आमचे नेते नाहीत हे आमचं दुर्भाग्य असं वाटायचं' असं बाबा म्हणाले आहेत. 'परंतू अजूनतरी मी कॉंग्रेस सोबत आहे. पुढे असेन की नाही ते बघू. जर गेलो तर सगळ्यांना सांगून जाईन' असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान संजय राऊत यांच्या टीपण्णीवर बोलणं त्यांनी तूर्तास टाळलं आहे. नक्की वाचा: Baba Siddique, Zeeshan Siddique करणार कॉंग्रेस ला रामराम? अजित पवारांच्या गटात सामील होण्याच्या चर्चांना उधाण .

पहा बाबा सिद्दीकींची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now