Akola: झोपाळ्याचा दोर गळ्यात अडकून तरुणीचा मृत्यू; अकोला येथील घटना

झोपाळ्यावर झोका घेता घेता झोक्याची दोरी गळ्यात अडकून एका तरुणीला फास लागला. या घटनेत या तरुणीचा मृत्यू झाला. कल्याणी दिपक पोटे (Kalyani Deepak Pote) असे या तरुणीचे नाव आहे. ती 21 वर्षांची होती.

Hanging | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

अकोला (Akola) जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याती रिधोरा (Ridhora) गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. झोपाळ्यावर झोका घेता घेता झोक्याची दोरी गळ्यात अडकून एका तरुणीला फास लागला. या घटनेत या तरुणीचा मृत्यू झाला. कल्याणी दिपक पोटे (Kalyani Deepak Pote) असे या तरुणीचे नाव आहे. ती 21 वर्षांची होती. कल्याणी डी.एडचे शिक्षण घेत होती. ज्या पद्धतीने कल्याणी पोटे हिचा मृत्यू झाला तो प्रकार पाहून आणि ऐकुन तिच्या कुटुंबीयांसह अनेकांना धक्का बसला आहे. परिसारत तिच्या मृत्यूची जोरदार चर्चा सुरु आहे.

झोपाळ्याच्या दोरीचा फास गळ्यात अडकल्यांनतर कल्याणी हिला सावरायची संधीच मिळाली नाही. गळ्यात अडकलेल्या दोरीचा झटका बसल्याने तिच्या गळ्याला जबरी मार लागला. त्याच अवस्थेत ती बराच काळ पडून होती. धक्कादायक म्हणजे तिची अवस्था कोणाच्याच लक्षात आली नाही. वेळीच मदत झाली असती तर कदाचित कल्याणीचे प्राण वाचले असते. कल्याणीची आई काही कामसाठी घराच्या गच्चीवर गेली होती. तर वडील बाहेरगावी गेल्याने गैरहजर होते. त्यामुळे गळ्यात दोर अडकलेल्या अवस्थेत असलेल्या कल्याणीच्या मदतीला कोणीच आले नाही. (Shocking! आई-मुलाच्या नात्याला काळिमा; सतत रडते म्हणून आईने आपल्या 27 दिवसांच्या बाळाचे डोके भिंतीवर आपटून मारून टाकले)

गच्चीवरील काम आटोपून आई जेव्हा खाली आली तेव्हा घरातील दृश्य पाहून तिला धक्का बसला. तिने आरडाओरडा करुन शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांच्या मदतीने तिने कल्याणीला दवाखाण्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारापर्वीच मृत घोषीत केले. झोपाळ्यातील उशी सरकली आणि ती खाली पडली. त्यातच तिला दोरीचा फास लागला. तिला जर वेळीच मदत मिळाली असती तर कदाचित तिचे प्राण वाचले असते, अशी चर्चा परिरात सुरु आहे. तुरुणपणी आलेल्या अकाली मृत्यूमुळे कल्याणीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात शोककळा पसरली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)