7th Pay Commission: राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग लागू- मंत्री धनंजय मुंडे

या निर्णयाचा राज्यातील 50 महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांवरील 562 कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

Dhananjay Munde | (Photo Credits: Facebook)

राज्यातील अकृषिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या 50 समाजकार्य महाविद्यालयांतील शिक्षक व समकक्ष पदांवरील कर्मचाऱ्यांना, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुषंगाने 7 वा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे दिली आहे. या निर्णयाचा राज्यातील 50 महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांवरील 562 कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

एकूण अनुदानित 50 महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल असे 562 कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांना 7 व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी 1 जानेवारी 2016 पासून लागू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.