Dhule: हाडाखेड तपासणी नाक्यावर 12 तलवारींसह मुद्देमाल हस्तगत, दहा जणांचा अटक

याप्रकरणी 11 संशयितांविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर पोलिसांनी वाहनासह 12 तलवारींसह इतर प्राणघातक हत्यारे असा सहा लाख, 29 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी 11 संशयितांविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी सतपाल सोनवणे, किरण धुळेकर, विकास ठाकरे, सखाराम पवार,सचिन सोनवणे,राजू पवार, विशाल ठाकरे, संतोष पाटील,अमोल चव्हाण, विठ्ठल सोनवणे या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. हेही वाचा Milk Price Hike: मुंबईमध्ये म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 5 रुपये दरवाढ; 1 मार्चपासून नवे दर लागू

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement