‘Wear Your White’ Protest in Mumbai: मुंबई मध्ये लोकल रेल्वे प्रवाशांनी हातावर काळ्या फिती बांधून लोकल मधील वाढती गर्दी, ढिसाळ कारभाराचा केला निषेध

14 ऑगस्टला रेल्वे अधिकारी आणि प्रवासी संघटनेच्या झालेल्या बैठकीमध्ये या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. आज प्रवासी संघटनांनी 25 हजार काळ्या फिती वाटल्या आहेत. बैठकीमध्ये अपेक्षित बोलणी न झाल्याने आजचं हे आंदोलन आहे.

Wear Your White Protest | X

मुंबई लोकलच्या प्रवाशांनी आज "Wear Your White" म्हणत अनोखं आंदोलन छेडल्याचं पहायला मिळालं आहे. मुंबईच्या लोकल मध्ये सध्या वाढती गर्दी आणि व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार पाहता काही रेल्वे संघटनांनी आज अनोख्या माध्यमातून निषेध नोंदवला. प्रवाशांनी संपूर्ण पांढरे कपडे परिधान केले होते तर हातात निषेधाच्या काळ्या फिती बांधल्या होत्या. सोशल मीडीयात या आंदोलनाचे फोटोज, व्हिडिओज झपाट्याने शेअर केले जात आहेत.  14 ऑगस्टला रेल्वे अधिकारी आणि प्रवासी संघटनेच्या झालेल्या बैठकीमध्ये या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. आज प्रवासी संघटनांनी 25 हजार काळ्या फिती वाटल्या आहेत. बैठकीमध्ये अपेक्षित बोलणी न झाल्याने आजचं हे आंदोलन आहे. Mumbai Local Updates: पश्चिम रेल्वे मार्गावर आजही AC मुंबई लोकलच्या काही फेर्‍या तांत्रिक त्रृटींमुळे Non AC धावणार; इथे पहा वेळापत्रक.   

"Wear Your White" आंदोलनामध्ये प्रवासी

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement