Indian Diet, Tea-Turmeric Lowered Covid Severity: भारतीय आहार, चहा आणि हळदीच्या वापरामुळे कमी झाली कोविडची तीव्रता व मृत्यू- ICMR Study

कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान, कमी लोकसंख्या असलेल्या पाश्चात्य देशांच्या तुलनेत दाट लोकवस्ती असलेल्या भारतात मृत्यूचे प्रमाण 5-8 पट कमी होते.

थाळी

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एप्रिल आवृत्तीत प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, आयर्न (Iron), झिंक (Zinc) आणि फायबरने समृद्ध अशा भारतीय आहाराचे, चहाचे नियमित सेवन आणि जेवणात हळदीचा वापर यामुळे कोविडची तीव्रता आणि मृत्यू कमी झाला आहे. कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान, कमी लोकसंख्या असलेल्या पाश्चात्य देशांच्या तुलनेत दाट लोकवस्ती असलेल्या भारतात मृत्यूचे प्रमाण 5-8 पट कमी होते.

भारत, ब्राझील, जॉर्डन, स्वित्झर्लंड आणि सौदी अरेबियाच्या शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने केलेल्या या अभ्यासाचे उद्दिष्ट, पाश्चात्य आणि भारतीय लोकसंख्येतील कोविड-19 तीव्रतेतील फरक आणि मृत्यू यांच्याशी आहाराच्या सवयींचा संबंध आहे का हे तपासणे होते. (हेही वाचा: भारतामध्ये 24 तासांत नवे कोरोनारूग्ण 10 हजारांच्या पार; केसलोड 63,562)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement