Lalbaugcha Raja 2023 Live Streaming: आता घरबसल्या घ्या लालबागच्या राजाचे दर्शन; या' ठिकाणी पहा गणेशोत्सवाचे लाईव्ह स्ट्रिमिंग (Watch)

या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी कित्येक किलोमीटरची रांग लागलेली असते. अशात काही वेळा रांगेत उभे राहून गणपतीपर्यंत पोहोचण्यासाठी 20 ते 25 तास लागतात.

Lalbaugcha Raja 2023 Live Streaming: आता घरबसल्या घ्या लालबागच्या राजाचे दर्शन; या' ठिकाणी पहा गणेशोत्सवाचे लाईव्ह स्ट्रिमिंग (Watch)
Lalbaugcha Raja 2023 Live Streaming

Lalbaugcha Raja 2023 Live Streaming: देशभरात आज गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. महाराष्ट्रात तर या सणाची खास धामधूम पाहायला मिळते. राज्यात काही मंडळांचे गणपती हे विशेष प्रसिद्ध आहेत व त्यामध्ये अग्रणी आहे तो म्हणजे मुंबईमधील लालबागचा राजा. नवसाला पावणारा अशी या गणपती ख्याती आहे त्यामुळे लांबून लोक या गणपतीच्या दर्शनासाठी येतात. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी कित्येक किलोमीटरची रांग लागलेली असते. अशात काही वेळा रांगेत उभे राहून गणपतीपर्यंत पोहोचण्यासाठी 20 ते 25 तास लागतात. मात्र तुम्ही घरबसल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ शकतात. यासाठी मंडळाने त्यांच्या सोशल मिडिया खात्यांवर सोय उपलब्ध करून दिली आहे. लालबागचा राजा मंडळाच्या अधिकृत युट्युब चॅनलवर तुम्ही गणपतीचे दर्शन घेऊ शकता. (हेही वाचा: Ganesh Chaturthi 2023 Wishes In Marathi: गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा संदेश, WhatsApp Messages, Greetings, Quotes द्वारा शेअर करत स्वागत करा गणपती बाप्पाचं!)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 19, 2023 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).