Kargil Vijay Diwas 2021 निमित्त जम्मू-कश्मीर येथील भारतीय सेनेच्या मुख्यालयात सेलिब्रेशनला सुरुवात (Watch Video)

कारगिल विजय दिवस 2021 निमित्त जम्मू-कश्मीर येथील उदमपूर मध्ये भारतीय सैन्याच्या मुख्यालायात सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे.

Kargil Vijay Diwas 2021 Celebration (Photo Credits-ANI)

Kargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवस 2021 निमित्त जम्मू-कश्मीर येथील उदमपूर मध्ये भारतीय सैन्याच्या मुख्यालायात सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. यंदा 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जाणार असून 22 वर्ष पूर्ण होणार आहे. तर कारगिल विजय दिवसासाठी खास आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या दरम्यान जम्मू-कश्मीर मधील 'शौर्य बँड' यांनी कारगिल युद्धातील जवानांना सन्मानित करण्यासाठी देशभक्ती आणि राष्ट्राच्या प्रति एक गाणे सादर केले. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कोरोनाच्या नियमांचे पालन करत करण्यात आले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)