Chinchpokali cha Chintamani 2024 First Look: चिंचपोकळीच्या चिंतामणी चा आगमन सोहळा सुरू; इथे पहा पहिली झलक (Watch Video)
निळ्या रंगातील धोतर आणि उपरणामधील बाप्पाचं पहिलं रूप समोर आलं आहे
Chinchpokali cha Chintamani 2024 Aagman Sohala: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा मुंबई मध्ये सुरू झाला आहे. यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणी चं 105 वं वर्ष आहे. लालबाग परेल भागामध्ये आज (31 ऑगस्ट) गणेश भक्त मोठ्या संख्येने रस्त्यावर आले आहेत. गणेश टॉकीज ते चिंतामणी मंडप या भागामध्ये चिंतामणी भक्त उपस्थित आहेत. जगन्नाथ मंदिराच्या थीम मध्ये चिंतामणी मंडपात विराजमान होणार आहे. 7 सप्टेंबर पासून बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी सुरू होणार आहे. 17 सप्टेंबर पर्यंत तो भाविकांच्या सेवेत असणार आहे. Chinchpokli cha Chintamani Aagman Sohala 2024: मुंबई पोलीस दलाकडून चिंतामणीच्या आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना सुरक्षेच्या दृष्टीने खास आवाहन (Watch Video).
पहा चिंचपोकळीच्या चिंतामणी ची पहिली झलक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)