Peach Fuzz is the Color of the Year 2024: पँटोनने जाहीर केला 'कलर ऑफ द इयर 2024'; 'पीच फझ' असेल पुढील वर्षीचा रंग (Video)
पीच फझ आगामी वर्षभर डिझाइन, फॅशन आणि जीवनशैलीच्या विविध पैलूंवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडेल अशी अपेक्षा आहे.
पँटोन कलर इन्स्टिट्यूट दरवर्षी ट्रेंडचे विश्लेषण करून नवीन वर्षाचे रंग घोषित करते. नुकतेच त्यांनी 2024 वर्षासाठी एका सौम्य आणि सुंदर रंगाची घोषणा केली आहे. जगाने या वर्षी मानवी संघर्षाची अनेक दृश्ये जवळून पाहिली आहेत आणि म्हणूनच, मानवी करुणेचे प्रतीक मानून पॅन्टोनने ‘पीच फज’ (Peach Fuzz) कलरला वर्ष 2024 चा रंग म्हणून घोषित केले आहे. या शेडला अधिकृतपणे ‘पँटोन 13-1023 पीच फझ’, असे नाव देण्यात आले आहे. हा रंग कोमलतेचे प्रतीक आहे. तो काळजी, समुदाय आणि सहकार्याचा संदेश देतो. समाजात सहानुभूती आणि समजूतदारपणाची जाणीव प्रतिबिंबित करतो. एकता आणि भावनिक कल्याणाची भावना वाढवणे हे या रंग निवडीमागील उद्दिष्ट आहे. आर्किटेक्चर आणि इंटीरियर डिझाइनच्या जगात पीच फझचा वापर स्वागत वातावरण तयार करण्यासाठी केला जातो. हा रंग शांतता वाढवतो आणि वैयक्तिक वाढीसाठी जागा प्रदान करतो. हा रंग पेंटिंगमध्ये असो, घराच्या सजावटीमध्ये असो किंवा फर्निचरमध्ये असो, तो जिव्हाळा आणि उबदारपणा वाढवतो.
पीच फझ आगामी वर्षभर डिझाइन, फॅशन आणि जीवनशैलीच्या विविध पैलूंवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडेल अशी अपेक्षा आहे. पॅन्टोन कलर इन्स्टिट्यूटने 1999 मध्ये पॅन्टोन कलर ऑफ द इयर शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला, ज्याचा उद्देश जगभरातील डिझाइन समुदाय आणि रंगप्रेमींमध्ये संवाद वाढवणे हा आहे. (हेही वाचा: Khushi Kapoor in Sridevi's Iconic Gown: ‘The Archies’ च्या प्रिमियरला खूशी कपूर ने आई श्रीदेवीचा ड्रेस आणि दागिने परिधान करत दिली भावनिक मानवंदना)