Anant Ambani and Radhika Merchant Wedding LIVE Streaming Online: आज मुंबईमध्ये पार पडणार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्यदिव्य विवाहसोहळा; 'या' ठिकाणी पाहू शकाल या लग्नाचे थेट प्रक्षेपण (Video)

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा लग्नसोहळा अतिशय भव्यदिव्य असा आहे. या लग्नाला देशातील आणि जगातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

Anant Ambani and Radhika Merchant Wedding LIVE Streaming Online

Anant Ambani and Radhika Merchant Wedding LIVE Streaming: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आज, 12 जुलै 2024 रोजी राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हे लग्न पार पडत आहे. आज रात्री 8 वाजता वरमाला होईल व त्यानंतर रात्री 9.30 वाजता सप्तपदी व इतर विधी होतील. अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा लग्नसोहळा अतिशय भव्यदिव्य असा आहे. या लग्नाला देशातील आणि जगातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये बॉलीवूड, हॉलिवूड स्टार्स, अनेक राजकारणी आणि प्रसिद्ध उद्योगपतींचा समावेश आहे. जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी हे एक लग्न असणार आहे. लग्नासाठी अंबानी हाऊस अँटिलियाला वधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. हळूहळू पाहुण्यांचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. अशात देशाचे लक्ष या लग्नावर लागले आहे. तुम्हीही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचे लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन पाहू शकता. (हेही वाचा: Kim and Khloe Kardashian Explore Mumbai in Auto Rickshaw: किम आणि ख्लो कार्दशियन करत आहे ऑटो रिक्षाची सवारी)

पहा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे थेट प्रक्षेपण- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)