Instagram Reels Craze Takes Another Life: धबधब्यावर रिल्स शूट करताना तरुण 150 फुट खोल दरीत पडला, राजस्थान येथील घटना (Watch video)

रिल्स शूट करताना, धरणातील पाण्याचा प्रवाहाने एक तरुण वाहून गेल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Waterfall in Rajasthan’s PC TW

Instagram Reels Craze Takes Another Life:  राजस्थान येथील भिलवाड परिसरातील धबधब्यावर काही तरुणांना रिल्स शूट करणं महागात पडले आहे. रिल्स शूट करताना, धरणातील पाण्याचा प्रवाहाने एक तरुण वाहून गेल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धरणातील पाण्याचा प्रवाह खुप असल्याने एक तरुण वाहून गेला. या घटनेचा एकाने व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. सर्व मित्र सहलीसाठी धबधब्यावर आले होते. त्यावेळी रिल्स शूट करण्यासाठी ते सर्वजण धबधब्याच्या मधोमध गेले त्यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला त्या पाण्यात एक तरुण वाहून गेला. त्यानंतर तो थेट १५० फुट खोल दरीत पडला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो वाचू शकला नाही.(हेही वाचा-    हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरूच, लाहौल-स्पितीमध्ये पुन्हा ढगफुटी, पूरसदृश परिस्थिती - VIDEO)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)