Uttar Pradesh Shocker: आई आणि मुलाची हत्या करून तरुणाने संपवलं स्वत:च आयुष्य, न्यू आग्रा येथील खळबळजनक घटना
तरुणाने आपल्या आईची आणि १२ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यानंतर तरुणाने स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केली आहे.
Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशात न्यू आग्रा येथे वकील कॉलनीत एका तरुणाने आपल्या आईची आणि १२ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यानंतर तरुणाने स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केली आहे. एकाच घरात तीन मृतदेह आढळून आल्याने या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडिओ लॅपटॉपमध्ये सापडला, ज्यात त्याने कबुली दिली आहे की तो आर्थिक परिस्थितीशी सामना करू शकत नव्हता. त्यामुळे दोघांचा जीव घेऊन आत्महत्या करत आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. तरुण प्रताप सिंग असं आत्महत्या करण्याऱ्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान त्याची पत्नी ही राजस्थानला नातेवाईकांकडे गेली होती. या घटनेअंतर्गत पोलिस चौकशी करत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement