Manipur Violence: मणिपूरच्या इंफाळमध्ये पुन्हा हिंसाचार; जमावाने केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घराला लावली आग

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी केंद्रीय मंत्री घरी नव्हते. एवढेच नाही तर न्यू चेकऑन येथील दोन घरांना हल्लेखोरांनी आग लावली. त्यानंतर सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या.

Union Minister RK Ranjan Singh (PC - ANI)

Manipur Violence: मणिपूरमधील इंफाळमध्ये गुरुवारी रात्री जमावाने केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घराला आग लावली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी केंद्रीय मंत्री घरी नव्हते. एवढेच नाही तर न्यू चेकऑन येथील दोन घरांना हल्लेखोरांनी आग लावली. त्यानंतर सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. मी सध्या केरळमध्ये अधिकृत कामासाठी आहे. सुदैवाने, काल रात्री माझ्या इंफाळच्या घरी कोणीही जखमी झाले नाही. हल्लेखोर पेट्रोल बॉम्ब घेऊन आले आणि माझ्या घराच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर नुकसान केलं असल्याचं राजकुमार रंजन सिंग यांनी एएनआयला सांगितलं आहे.

याआधी 14 जून रोजी अज्ञात लोकांनी इंफाळच्या लामफेल भागात महिला मंत्री नेमचा किपजेन यांच्या अधिकृत निवासस्थानालाही आग लावली होती. मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या अचानक गोळीबारात 9 जण ठार झाले तर 10 जण जखमी झाले. यादरम्यान खमेनलोक गावातील अनेक घरांनाही उपद्रवींनी आग लावली. तामेंगलाँग जिल्ह्यातील गोबाजंग येथेही अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. (हेही वाचा - Karnataka Textbook Row: कर्नाटक सरकारने शालेय पाठ्यपुस्तकांमधून वगळला RSS संस्थापक KB Hedgewar यांचा धडा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement