Video Viral: पोलिस स्टेशन परिसरात गांजा ओढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाला अटक, हैद्राबाद येथील घटना

राज्यातील रामगोपालपेट पोलिस स्टेशनच्या परिसरात तरुण गांजा ओढत असताना दिसला आहे.

Hydrabad Viral Video PC Twitter

Video Viral: हैद्राबाद येथील एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आले आहे. राज्यातील रामगोपालपेट पोलिस स्टेशनच्या परिसरात तरुण गांजा ओढत असताना दिसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे रामगोपालपेट पोलिस स्टेशनसमोर गांजा पदार्थांचे धुम्रपान करताना दिसत आहे. शुक्रवारी परिसरातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील 8 दिवस आरोपी पोलिस कस्टडीत राहणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement