Tamil Nadu: ईडीने अटक केलेल्या स्टॅलिन सरकारमधील मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांची तामिळनाडूच्या राज्यपालांनी केली हकालपट्टी

बुधवारी चेन्नई सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस अली यांनी मंत्री सेंथिल बालाजी यांच्या न्यायालयीन कोठडीत 12 जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले होते.

V Senthil Balaji (PC - ANI)

Tamil Nadu: तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवीने तुरुंगात असलेल्या व्ही. सेंथिल बालाजीला मंत्रिपरिषदेतून तत्काळ प्रभावाने बडतर्फ केलं आहे. मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांच्यावर भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये गंभीर फौजदारी कारवाई होत आहे, ज्यात नोकरीच्या बदल्यात पैसे घेणे आणि मनी लाँड्रिंगचा समावेश आहे. बुधवारी चेन्नई सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस अली यांनी मंत्री सेंथिल बालाजी यांच्या न्यायालयीन कोठडीत 12 जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले होते.

बालाजीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 14 जून रोजी नोकरीसाठी रोख रकमेप्रकरणी अटक केली होती. छातीत दुखू लागल्याने त्यांना चेन्नईच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर 15 जून रोजी मद्रास उच्च न्यायालयाने सेंथिल बालाजीला खासगी रुग्णालयात हलवले. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. (वाचा- Rahul Gandhi Manipur Visit: राहुल गांधी पोहोचले मणिपूरात, रिलीफ कॅम्पमध्ये मुलांसोबत केले जेवण, पाहा VIDEO)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)